Type Here to Get Search Results !

प्राथमिक शिक्षक बँक सभासदांची पालकत्व स्वीकारणारी संस्था : यु.टी. जाधव; बँकेच्या वतीने कै. ढोबळे कुटुंबियांना ३ लाख रुपयाची मदत.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेने आजपर्यंत सभासदांचे संसार उभे करण्याचे कार्य केले असून सभासदांच्या छोट्या-मोठ्या अडीअडचणींना सहकार्य करून सभासदांची कामधेनू म्हणून ही बँक नावारूपास आली आहे. दुर्दैवाने एखाद्या सभासदांचा अंत झाला तर कर्जदारांचे वारसदार व जमीनदार यांची आर्थिक ससेहोलपट होऊ नये म्हणून बँकेने कर्जदार सभासद मयत झाला तर त्यांचे 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफी, बिगर कर्जदाराचा दुर्दैवी अंत झाला तर त्यांच्या वारसास ३ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि डीसीपीएस धारकाचा दुर्दैवाने अंत झाला तर त्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांपर्यंतची मदत देणारी महाराष्ट्रातील एकमेव सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक असून सभासदांच्या वारसांचे पालकत्व स्वीकारणारी ही संस्था असल्याचे प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव यांनी माळशिरस तालुक्यातील कुरंदावडे शाळेचे शिक्षक कै.सदाशिव बंडू ढोबळे यांच्या कुटुंबियांना ३ लाख रुपये चा मदतीचा चेक देताना केले. 
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन, सर्व संचालक मंडळ सदर कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी माळशिरस तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष शरद रुपनवर, आटपाडी तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष शामराव ऐवळे, सरचिटणीस प्रवीण बाड, शिक्षक समितीचे उपाध्यक्ष रामेश्वर आत्राम, शिक्षक समिती विभागीय सचिव दिपक कुंभार, शिक्षक नेते संजय कबीर, अच्युत गायकवाड, शंकर खरात, अमरसिंह रजपूत, प्रदीप भोसले, जयराम गोफणे, आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies