शिक्षण विभागाच्या विरोधात मनसेचे उपोषण. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 25, 2019

शिक्षण विभागाच्या विरोधात मनसेचे उपोषण.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिंनिधी : तालुक्यातील शिक्षण विभागाच्या विरोधात मनसेचे माढा माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी पंचायत समिती समोर उपोषण सुरू केले आहे यामध्ये प्रमुख मागण्यात प्रभारी शिक्षण अधिकाऱ्याच्या जागी धडाडीचा कार्यक्षम पात्र गटशिक्षण अधिकारी मिळावा  सध्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी देशमुख यांचा अनागोंदी कारभार व खातेनिहाय चौकशी करून निलंबन व्हावे या सहा प्रमुख मागण्यांसाठी मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब बबनराव कर्चे यांनी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे. कर्चे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गटशिक्षण पुणे विभागीय कार्यालयात आयुक्तांना उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनी मार्फत चौकशी केली मात्र यात कारवाईने समाधान झाले नसल्यामुळे खर्चे यांनी पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे या उपोषणा वेळी आप्पासाहेब कर्चे मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे सह , कुंडलीकराजे मगर नगरसेवक  वक नवनाथ वाघमोडे सह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते आयुक्तालयात दिलेल्या निवेदनात गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कामाबरोबर शिक्षकांच्या बाबतीत त्यांनी आरोप केले आहेत यामध्ये प्रामुख्याने ५ वर्षापासुन या तालुक्याला गट शिक्षण अधिकारी नाही ,शिक्षकांची बेकायदेशीर कामे केली आहेत शिक्षकांना त्यांच्या जातीचा उल्लेख करून त्यांना माणहानी कारक वागणुक दिली जात आहे. अवेळी शाळेत येणे शिक्षकांवर असे विविध प्रकारचे आरोप निवेदनात करण्यात आलेले आहेत.
देशमुख यांचेकडील प्रभारी चार्ज काढुण ईतर पात्र अधीकाऱ्याकडे दिला जावा. व सध्याच्या कारभाराची खातेनीहाय  चौकशी व्हावी. आमचे आंदोलन शिक्षकां विरुद्ध नसून अधिकाऱ्याविरुद्ध आहे त्यामुळे शिक्षकांनी निषेध करण्याचा प्रश्न नाही . यामध्ये मुख्यकार्यकारी अधीकारी यांनी लक्ष घालुन योग्य तो मार्ग काढावा.

No comments:

Post a Comment

Advertise