माळखांबी जि.प. शाळेत बाबासाहेबांना अभिवादन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 7, 2019

माळखांबी जि.प. शाळेत बाबासाहेबांना अभिवादन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा माळखांबी ता, माळशिरस, जि. सोलापूर येथे  त्यांना अभिवादन करण्यात आले. 
विश्वरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन माळखांबी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रकुमार क्षीरसागर  यांनी केले. शिका, संघर्ष करा, संघटित व्हा असा संदेश डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्याप्रकारे तुम्ही सुद्धा भरपूर अभ्यास करून तुमचे भवितव्य उज्वल करा असे प्रतिपादन शाळेतील शिक्षक  विष्णू जायभाय सर यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांविषयी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे  आभार अशोक पाटील सर यांनी मानले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्रकुमार क्षीरसागर, शिक्षक दत्तात्रय  लोखंडे, अशोक पाटील, दत्तात्रय कांबळे, सुनीता पवार व विष्णू जायभाय उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise