Type Here to Get Search Results !

सकारात्मक विचार आनंदी जगण्याचा पासवर्ड - अविनाश हळबे : वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला कार्यक्रम.

माणदेश न्युज
तासगाव प्रतिनिधी: पर्यावरण संतुलनाची जबाबदारी माणसावरच आहे ती आपण प्रेमाने व आपुलकीने पार पाडली तर निसर्ग आणखी सुंदर होईल, ध्येय गाठण्यासाठी अथक प्रयत्न करावेत, सकारात्मक विचार हाच आनंदी जगण्याचा पासवर्ड आहे असे उद्गार लेखक अविनाश हळबे यांनी पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित 'लेखक आपल्या भेटीला ' या कार्यक्रमात बोलताना काढले. ते पुढे म्हणाले निसर्गाची रचना अद्भुत आहे निसर्गावर प्रेम करणाऱ्या माणसांची कथा म्हणजे 'सोयरा वृक्षवल्लीचा ' पंचमहाभूतांपासून बनलेली सृष्टी, निसर्गातील पशू-पक्षी, कीटक यापासून आपणास अनेक गोष्टी शिकता येतात. हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. 
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना या व्याख्यानाचा निश्चितच फायदा होणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला वाणिज्यप्रमुख प्रा.ए.बी. कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.डी.एन.यादव -पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला बारावी कला वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies