नातेपुते पोलीस स्टेशनचा वर्धापन दिन आरोग्य शिबिर वृक्षरोपणने संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 17, 2019

नातेपुते पोलीस स्टेशनचा वर्धापन दिन आरोग्य शिबिर वृक्षरोपणने संपन्न.


माणदेश एक्सप्रेस न्यूज
नातेपुते / प्रमोद शिंदे : नातेपुते येथील पोलिस स्टेशनचा 27 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मुंबई येथील 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्यात  शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रतिमेचे पूजन  व  दीप प्रज्वलन करून करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त दिनानिमित्त मेडिकल असोसिएशन च्या वतीने सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.तसेच डॉक्टर्स  व मान्यवरांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमादरम्यान माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी मोरे बोलताना म्हणाले की सध्याचे जीवन धावपळीचे झाले आहे त्यामुळे डायबेटिस, बीपी सारखे आजार जास्त प्रमाणात होऊ लागले आहेत पोलिसांचं जीवसुद्धा सतत तणावात असते स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे दररोज व्यायाम केला पाहिजे. तसेच सरपंच बी.वाय राऊत म्हणाले की गेल्या सत्तावीस वर्ष नातेपुते पोलीस स्टेशनला चांगले अधिकारी लाभले आहेत व नातेपुते पोलिसांनी चांगले कामगिरी केली आहे. मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरनी घेतलेला आजचा उपक्रम अतिशय चांगला आहे. पोलीस जनतेची काळजी करतात आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस स्टेशनचे ए. पी.आय युवराज खाडे यांनी केले प्रास्ताविकात ते म्हणाले की 16 /12 /1992 रोजी नातेपुते पोलीस स्टेशनची स्थापना झाली आहे. हे पोलीस स्टेशन लोकांच्या सोयीसाठी असून संवेदनशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाते परंतु नातेपुते व परिसरातील लोक चांगले असल्याकारणाने सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था चांगली आहे, या कार्यक्रमास सरपंच बी.वाय राऊत, डॉक्टर मोरे, अकलूजचे डॉक्टर समीर बंडगर, डॉ.समीर दोशी डॉ. सर्जे, नातेपुते येथील डॉ. विठ्ठल कवितके, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रेय निटवे, सचिव डॉक्टर वाघमोडे, डॉ. नरेंद्र कवितके, महिला डॉक्टर काजल कवितके, डॉ.योगिता निटवे, डॉक्टर लवटे मॅडम, डॉ.ढोबळे मॅडम, पंचक्रोशीतील अनेक डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित होते. तसेच मेडिकल असोसिएशनचे आप्पासाहेब शेंडगे, डॉ. मोठे डॉ. दत्तात्रेय नवगिरे,डॉ.कुदळे तसेच सर्व मेडिकल स्टोअर्स यांनी औषध पुरवठा केला.याप्रसंगी पी.एसआय  इंगळे, माजी सरपंच अमरशील देशमुख, सरपंच बाजीराव काटकर, अतुल पाटील, राजकुमार हिवरकर, शाहीद भाई मुलांनी, भैया चांगण, संजय उराडे ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, श्रीकांत बाविस्कर, पंचक्रोशीतील पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवकुमार मदभावी, बबलू गाडे, सिद्धू कंटोळे, विशाल घाडगे, असलम काझी, दत्तात्रेय काटे, पोलीस नाईक माने.ए. एस.आय,राजाराम शिंदे व सर्व पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Advertise