जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे, समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद सांगली, दिव्यांग शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 डिसेंबर 2019 रोजी जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम डेक्क्न मफन्युफॅक्चर्स असोसिएशन हॉल माधवनगर रोड सांगली येथे सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत संपन्न होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व इतर समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
दिनांक 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 9 जनजागृती रॅली (वसंतदादा पाटील स्मारक ते डेक्क्न हॉल माधवनगर रोड सांगली, सकाळी 9 ते 10 दिव्यांग विद्यार्थी चहापान, सकाळी 10 ते 11 प्रतिमापूजन / कार्यक्रमाचे उद्घाटन/मान्यवरांचे मनोगत, सकाळी 11 ते 11.40 पुरस्कार वितरण (आदर्श विशेष शिक्षक व शिक्षकेत्तर, कर्मचारी, प्रेरणा पुरस्कार, सेवानिवृत्त कर्मचारी सन्मान पुरस्कार), सकाळी 11.40 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दिव्यांग शाळा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत मध्यांतर (भोजन), दुपारी 2 ते 4.45 वाजेपर्यंत दिव्यांग शाळा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी 4.45 ते 5 वाजेपर्यंत समारोप अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

No comments:

Post a Comment

Advertise