प्रा.मेघा पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

प्रा.मेघा पाटील यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
तासगाव प्रतिनिधी : पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील रसायनशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या प्रा.मेघा उदय पाटील यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी 'स्टडीज ऑन न्यू मेथडॉलॉजीज फॉर  हेटेरोसायक्लाझेसन ' या विषयावर प्रबंध सादर केला. यासाठी त्यांना रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.एस.एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
    मेघा पाटील या याच कॉलेजच्या माझी विद्यार्थिनी आहेत. डिसेंबर २०११मध्ये यूजीसी नेट जीआरएफ परीक्षा पास झाल्या. मार्च २०१३मध्ये गेट परीक्षा पास झाल्या. प्रबंध तयार करत असताना पती प्रा. सचिनकुमार शिंदे व नातेवाईक यांचे सहकार्य त्यांना लाभले.
     त्यांच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिवा प्राचार्या सौ.शुभांगी गावडे, सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र शेजवळ, व प्राचार्य डॉ. युवराज भोसले , प्राचार्य.डॉ.आर.आर.कुंभार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, उपप्राचार्य डॉ.व्ही.वाय.पवार व प्रा.के.एस.पाटील तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Advertise