स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी आणि आधार लाईफ सायन्सेस यांच्यात सामंजस्य करार ; संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 6, 2019

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी आणि आधार लाईफ सायन्सेस यांच्यात सामंजस्य करार ; संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) आणि औषध निर्माण क्षेत्राशी निगडीत असलेल्या सोलापूर येथील ‘आधार लाईफ सायन्सेस’ यांच्यात सामंजस्य करार नुकताच स्थापित करण्यात आल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. 
 स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) मधील विद्यार्थी आणि स्टाफ यांना औषध निर्माण क्षेत्रासंबंधी ‘आधार लाईफ सायन्सेस’ कंपनीच्या माध्यमातून प्रात्यक्षिक देणार आहेत. तसेच संशोधन प्रकल्पासाठी सहायता करणार असून विद्यार्थी व स्टाफ यांना या कराराच्या माध्यमातून कंपनीला भेट देवून योग्य मार्गदर्शन घेता येणार आहे. या सामंजस्य कराराचा विद्यार्थी व प्राध्यापकांना फायदा होणार आहे. ‘आधार लाईफ सायन्सेस’ यांचा हा सामंजस्य करार तीन वर्षासाठी असून या करारावर ‘आधार लाईफ सायन्सेस’ कंपनीचे संचालक आशीष तापडीया यांची स्वाक्षरी आहे. या करारासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डॉ. मिथुन मणियार, प्रा. रामदास नाईकनवरे, प्रा. व्ही. व्ही. मोरे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. यापूर्वी बी. फार्मसीने नऊ कंपनी समवेत सामंजस्य करार झाला असून आता यात या कराराची भर पडली आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी थेट औषध निर्मिती कंपन्यांबरोबर संपर्क साधून नवीन संशोधन व औषध निर्मिती करण्यासाठी अधिक माहिती मिळवू शकतात. हा करार स्थापन केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी बी. फार्मसीचे प्राचार्य व प्राध्यापकांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise