Type Here to Get Search Results !

विटा बसस्थानक येथे स्वच्छता श्रमदान : विटा नगरपरिषदेसह शहरातील रहिवाशी, शालेय विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
विटा/प्रतिनिधी :  स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये देशपातळीवर 4 क्रमांक पटकावून देशामध्ये नावलौकिक मिळवलेल्या विटा नगरपरिषदेला आता स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देशामध्ये 1 क्रमांकाची आस लागली आहे. याच पार्श्वभूमीवर नगपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची जय्यत तयारी सुरू केली आहे. या स्वच्छ सर्वेक्षण 2020 च्या अंतर्गत शहरामध्ये स्वच्छता श्रमदान, रस्ते साफसफाई, गटर सफाई ची जोरदारपणे मोहीम राबविण्यात येत आहे. याच मोहिमे अंतर्गत काल  सकाळी 6 वाजता बस स्थानक परिसरा मध्ये स्वच्छता करण्यात आली. अग्निशामक दलाने संपूर्ण परिसर पाण्याने साफ केला. 
विटा शहराच्या मध्यवर्ती असलेले विटा बस स्थानक प्रशस्त भव्य आहे. विटा बसस्थानकामध्ये विविध भागातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. विटा बस स्थानक विटा नगरपरिषद सातत्य हा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानकातील सर्व व्यवसायिक व रहिवासी नागरिकांना या स्वच्छ सर्वेक्षण निमित्ताने सर्वांनी स्वच्छ व सुंदर परिसर ठेवा. तसेच स्वच्छता श्रमदाना मध्ये सहभागी झालेल्या श्रमांचे आभार मुख्याधिकारी अतुल पाटील मानले.
या स्वच्छता मोहीमेवेळी डेपो मॅनेजर ए.स. थोरात, सहय्यक डेपो  मॅनेजर यू. टी. पवार, बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत  खिलारे, प्राचार्य बारवडे, एनसीसी विभागाचे प्रमुख प्राचार्य चिले, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत नगरपरिषद कर्मचारी व  पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies