व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र सांगली मार्फत व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नेहरु युवा केंद्राशी संलग्नीत असणाऱ्या युवक युवती रजिस्टर मंडळे तसेच सेवाभावी संस्थानी प्रशिक्षणाचे आयोजन करावयाचे आहे. यासाठी त्यांनी नेहरु युवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी केले आहे.
श्री. मानखेडकर म्हणाले, प्रशिक्षणामध्ये 18 ते 29 वयोगटातील युवक-युवतींसाठी

शेतीविषयक प्रशिक्षण, यामध्ये मशरुम लगवड, औषधी वनस्पती लागवड, फळबाग, भाजीपाला लागवड, दुग्ध प्राणी संगोपन, दुध संकलन व विक्री, दुध प्रक्रिया, शेळीपालन, कुकुटपालन, हस्तकला व वस्तुनिर्मिती बेकरी प्रोडक्ट, बांबूकाम खेळणी तयार करणे, संगणक ज्ञान तसेच संगणक व मोबाईल दुरुस्ती, मोटार रिवायडिंग, टेलरींग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर यासारखे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आटपाडी, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ व तासगाव तालुक्यामध्ये प्रत्येकी एक  याप्रमाणे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये प्रत्येक तालुक्यातील 25 युवक व युवती यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जे युवक व युवती मंडळे क्रिडा स्पर्धांचे आयोजन करत आहेत व नेहरु युवा केंद्राशी संलग्नीत आहेत अशा मंडळानी क्रिडा साहित्यासाठी अर्ज करावेत. आटपाडी, पलूस, तासगाव व कडेगाव या तालुक्यामध्ये तालुकास्तरीय क्रिडास्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून हॉलीबॉल, कब्बडी, खो-खो, 100 मीटर व 400 मीटर प्रत्येकी 1 तालुक्यास स्पर्धाचे नियोजन करावयाचे आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील विजेता एक असे जिल्हास्तरीय क्रिडास्पर्धेस निमंत्रित करण्यात येणार असल्याचे श्री. मानखेडकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Advertise