रायगडाचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : मुख्यमंत्री ठाकरे . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

रायगडाचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध : मुख्यमंत्री ठाकरे .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
मुंबई : रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात आलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. या निधीतून रायगड किल्ला आणि परिसराचा सर्वांगीण विकास केला जाईल. यातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करुन त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमच्या दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise