जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची मुदतवाढ द्यावी : अरविंद चांडवले. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डची मुदतवाढ द्यावी : अरविंद चांडवले.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधीः एस.टी. महामंडळाने जेष्ठ नागरिकांरीता सवलतीमध्ये प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड दिले असून ते 1 जाने . 2020 पासून बंधनकारक केले आहे. परंतू अद्याप काही जेष्ठ नागरिकांकडे स्मार्ट कार्ड नाहीत त्यांना प्रवास करण्यासाठी अडचण येणार असल्याने स्मार्ट कार्ड ची मुदत वाढवावी या बाबतचे निवेदन आटपाडी आग्रा प्रमुख यांना देणार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नागरिक अरविंद चांडवले यांनी दै. माणदेश एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. 
आटपाडी तालुक्यातील अनेक जेष्ठ नागरिकांना या स्मार्ट कार्ड बाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांची स्मार्ट कार्ड काढू शकले नाहीत. बरेच जेष्ठ नागरिक हे आधार कार्ड, मतदान कार्ड व तहसील कार्यालयाने दिलेल्या कार्डावर सवलतीच्या दराने प्रवास करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सर्व जेष्ठ नागरिक यांना जो पर्यंत स्मार्ट कार्ड मिळत नाहीत तो पर्यंत त्यांच्याकडे असलेल्या शासकीय ओळखपत्रानुसार प्रवासामध्ये सवलत मिळावी असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Advertise