डाक विभागाची पणजी व मुंबई येथे पेंशन अदालत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 4, 2019

डाक विभागाची पणजी व मुंबई येथे पेंशन अदालत.


माणदेश एक्सप्रेस न्युज

सांगली : भारतीय डाक विभागाची क्षेत्रीय स्तरावरील पेंशन अदालत दिनांक २० डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्तर जनरल गोवा रिजन, पणजी येथे आयोजित केली असून तक्रारी स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १० डिसेंबर २०१९ आहे. तसेच सर्कल स्तरावरील पेंशन अदालत दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ११ वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, मुंबई येथे आयोजित केली असून तक्रारी स्वीकारण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे. अशी माहिती डाकघर सांगली विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी दिली. 
जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे, अशा निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारींचे ३ महिन्याच्या आत निवारण झालेले नाही अशा प्रकरणांचा या डाक पेंशन अदालतमध्ये विचार केला जाणार आहे. नितिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी तथा धोरणात्मक स्वरूप संबंधी इत्यादी तक्रारीचा विचार करण्यात येणार नाही. विहीत मुदतीनंतर मिळालेल्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही.
गोवा रिजन यामध्ये गोवा राज्य, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. गोवा रिजन मधील निवृत्ती वेतन धारक पणजी येथील पेंशन अदालतीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज श्रीमती गीता कुमारी, अकौंटस ऑफिसर / सचिव, पेंशन अदालत, पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी-403001 यांच्या नावे दिनांक १० डिसेंबर २०१९ पर्यंत पाठवू शकतात.
मुंबई येथील पेंशन अदालतीसाठी महाराष्ट्र व गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक विहीत नमुन्यातील अर्ज श्री. एस. यु. पानतावणे, वरिष्ठ लेखा अधिकारी / सचिव पेंशन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन दुसरा मजला, मुंबई-400001 यांच्या नावे दिनांक १० जानेवारी 2020 पर्यंत पाठवू शकतात.

No comments:

Post a Comment

Advertise