श्रीनाथ विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 9, 2019

श्रीनाथ विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य योगेश गुजरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन करुन संविधान शपथ घेतली. तद्नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपआपले विचार व्यक्त केले. यानंतर कविता पोरे व रेश्मा मुजावर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपले मुलभूत अधिकार व मुलभूत कर्तव्य याबद्दल माहिती सांगून आपली देशाबद्दल असणारी जबाबदारी सांगितली. यावेळी महेंद्र उंडाळे, सचिन बोरावके, पंकज नेवसे, कविता पोरे, प्रियंका खराडे, पल्लवी सपकाळ, कविता सिद, अंजूम शेख, निता जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी सर्व विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृषाली कोल्हटकर हिने केले. तर आभार स्वप्निल चव्हाण याने मानले.

No comments:

Post a Comment

Advertise