ग्राहक जनजागृती पंधरवाडा गोरडवाडी येथून शुभारंभ. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

ग्राहक जनजागृती पंधरवाडा गोरडवाडी येथून शुभारंभ.

माळशिरस प्रतिनिधी 
संजय हुलगे: माळशिरस गोरडवाडी येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस यांच्या रोप्यमहोत्सव वर्षानिमित्त ग्राहक जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन माजी सैनिक युवराज पिंगळे, सरपंच रामचंद्र गोरड, पोलीस पाटील नानासाहेब यमगर, तसेच जिल्हा उपाध्यक्ष सदानंद बडवे यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले. या प्रसंगी स्वामी विवेकानंद व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा उपाध्यक्ष सदनंद बडवे यांनी  ग्राहक जनजागृती विषयी सखोल व सोप्या भाषेत उपस्थित नागरिकांना कायदेविषयक हक्क व अधिकार कर्तव्य आणि फसवणूक झालेस कोठे व कशी तक्रार नोंदवावी याबाबत उदाहरणासह माहिती सांगितली. यास उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणी ग्राहक पंचायत समोर मांडली. त्यावर त्यांच्या शंकाचे निरसन बडवे यांनी केले.
२४ डिसेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक दिन तहसील कार्यालय माळशिरस येथे साजरा करण्यात येणार असून सदर कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच १५ डिसेंबर ते  २९ डिसेंबर पर्यंत ग्राहक जनजागृती पंधरवडा निमित्त शाळा महाविद्यालय, व ग्रामीण भागातील नागरिकांना आपले हक्क व कर्तव्य याबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस यांच्यावतीने केले आहे  याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
याप्रसंगी बोलताना दादासाहेब हुलगे यांनी उपस्थित नागरिकांना ग्राहक पंचायत व त्यांचे कार्य याविषयी अभ्यास पूर्ण माहिती सांगितली आणि ग्राहक पंचायत माळशिरस यांना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थित अखिल भारतीय ग्राहक पंचायत माळशिरस कार्यकारणीचे वामनभाऊ  वाघमोडे, महादेव भोसले , मुकुंद पंचवाघ, धनंजय केसकर, संजय हुलगे. सह बाळू कोळेकर, बाळासाहेब गोरड, भारत सरगर, महादेव कोकरे, मोहन गोरड, ब्रह्मदेव हुलगे, किसन गोरड, मामा पिंगळे , वैभव गोरड ,एकनाथ कोळेकर याकूब शिकलगार, मधु सुतार, पत्रकार स्वप्नील राऊत इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार संजय हुलगे यांनी केले.

No comments:

Post a Comment

Advertise