पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप,महिलांच्या कला गुणांना दिले प्रोत्साहन ; रणनवरे कुटुंबाचा उपक्रम ; गृह उपयोगी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 16, 2019

पुण्यतिथीनिमित्त शालेय साहित्याचे वाटप,महिलांच्या कला गुणांना दिले प्रोत्साहन ; रणनवरे कुटुंबाचा उपक्रम ; गृह उपयोगी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/संजय हुलगे : आजच्या युगात पुण्यतिथी कार्यक्रमावरती हजारो रुपये खर्च केला जातो. पण माणकी ता. माळशिरस येथील श्रीमती रंजना शिवाजी रणनवरे यांच्या कुटुंबाने आपल्या आईच्या पुण्यतिथी कार्यक्रम निमित्त वायफळ खर्चाला फाटा देत, शालेय विद्यार्थी यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करून शालेय साहित्य व महिलांच्या स्पर्धेचे आयोजन करून गृह उपयोगी साहित्य वाटप करून पुण्यतिथी कार्यक्रम साजरा केला.
श्रीमंत असो व गरीब पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पै पाहुणे, मित्र मंडळी यांना बोलावून विधी ,मंडप, भजन, कीर्तन, जेवण खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू आहेत. शिवाय वाढती महागाई असली तरी समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला आहे. परंतू समाजासाठी आपण काही देणं लागत या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत विविध स्पर्धेचे आयोजन करून साहित्य वाटप करत रणनवरे कुटुंबाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
पुण्यतिथी कार्यक्रमाच्या निमित्त ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. कार्यक्रमासाठी पुण्यतिथी समारंभ समितीच्या अध्यक्षा जयमाला देशमुख, कार्याध्यक्ष विश्वनाथ रणनवरे, सचिव मिनिनाथ रणनवरे, रत्नशिव पवार, शिवाजी रणनवरे, सविता देशमुख, अनिता भोसले, मुख्याध्यापिका सुषमा पिसे, शाळा व्यवस्थापक समितीचे आनंद शेंडगे उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी ग्लोबल इंग्लिस मिडीयम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सदाशिवराव माने विद्यालय येथील स्पर्धकांनी सहभाग घेत यश संपादन केले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये सानिका रणनवरे, दिक्षा भोसले, फिजा मुलाणी, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये छोटा गट प्रांजल कांबळे, वंशराज रणनवरे, सिद्धनाथ यमगर, प्राची धाईंजे, संकेत आदलिंगे तर सुंदर हस्ताक्षर मोठ्या गटामध्ये पूनम निंबाळकर, भाग्यश्री कुंभार, वैष्णवी चिंचकर रांगोळी स्पर्धेमध्ये सुसंगती रणनवरे, कोमल माने, स्नेहल सुतार मेहंदी स्पर्धेमध्ये अंजली रणनवरे, दिपाली धाईंजे, राणी रणनवरे या स्पर्धकांनी यश संपादन केले. यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

No comments:

Post a Comment

Advertise