लोटस इंग्लिश स्कूल मधील ऋतुजा सुरवसेला ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 20, 2019

लोटस इंग्लिश स्कूल मधील ऋतुजा सुरवसेला ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे शिष्यवृत्ती.


माणदेश एक्सप्रेस न्यूज
पंढरपूर/कासेगाव :येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलमधील इयत्ता आठवीची ऋतुजा सुरवसे या विद्यार्थ्यांनीस सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन तर्फे नुकतीच शिष्यवृत्ती देण्यात आली.
        सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनच्या या शिष्यवृत्तीसाठी तब्बल पाच हजार शाळेतून केवळ ३०८ मुलींचीच निवड करण्यात आली असून यामध्ये लोटसच्या ऋतुजा सुरवसे हिची वर्णी लागली असून ऋतुजा सुरवसेला पाच हजार रुपये शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ऋतुजा सुरवसे हीचा संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सत्कार केला. संस्थेचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे,अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच.एम. बागल, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, वर्गशिक्षक संपत लवटे, क्रीडा विभागप्रमुख मयुर वागज, ओलंपियाड विभाग प्रमुख सचिन निकम, आदीक्ष गायकवाड यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व स्तरातून ऋतुजा सुरवसे हिचे अभिनंदन होत आहे.
छायाचित्र-सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन तर्फे शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ऋतुजा सुरवसे हिचा सत्कार करताना संस्थेचे खजिनदार दादासाहेब रोंगे सोबत डावीकडून क्रीडा विभागप्रमुख मयुर वागज, प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण, वर्गशिक्षक संपत लवटे.

No comments:

Post a Comment

Advertise