Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : सन २०२० मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे. सदरचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक अनुक्रमे परीक्षेचे  नाव, जाहिरात, पूर्व व मुख्य परीक्षा दिनांक पुढीलप्रमाणे. राज्य सेवा परीक्षा २०२० – जाहिरात - डिसेंबर २०१९, पूर्व परीक्षा - ५ एप्रिल २०२०, मुख्य परीक्षा - ८, ९ व १० ऑगस्ट २०२०. दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२० - जाहिरात – जानेवारी २०२०, पूर्व परीक्षा – १ मार्च २०२०, मुख्य परीक्षा – १४ जून २०२०. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०२० - जाहिरात – जानेवारी २०२०, पूर्व परीक्षा – १५ मार्च २०२०, मुख्य परीक्षा – १२ जुलै २०२०. महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – जाहिरात – फेब्रुवारी २०२०, पूर्व परीक्षा – ३ मे २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त पेपर क्रमांक १ – मुख्य परीक्षा ६ सप्टेंबर २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक – मुख्य परीक्षा १३ सप्टेंबर २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक २ राज्य कर निरीक्षक – मुख्य परीक्षा २७ सप्टेंबर २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी – मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर २०२०.
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०२० – जाहिरात – मार्च २०२०, पूर्व परीक्षा – १० मे २०२०, मुख्य परीक्षा – ११ ऑक्टोबर २०२०. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – जाहिरात - मार्च २०२०, पूर्व परीक्षा – १७ मे २०२०, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० – मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबर २०२०. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – जाहिरात – एप्रिल २०२०, पूर्व परीक्षा – ७ जुन २०२०,  महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२० संयुक्त  पेपर क्रमांक १- मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर २०२०, महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक २ लिपिक- टंकलेखक – मुख्य परीक्षा ६ डिसेंबर २०२०, महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क – मुख्य परीक्षा १३ डिसेंबर २०२०, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२० - पेपर क्रमांक 2 कर सहायक – मुख्य परीक्षा २० डिसेंबर २०२०. महाराष्ट्र कृषि सेवा परीक्षा २०२० – जाहिरात – मे २०२०, पूर्व परीक्षा – ५ जुलै २०२०, मुख्य परीक्षा - १ नोव्हेंबर २०२०. सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२० – जाहिरात – सप्टेंबर २०२०, मुख्य परीक्षा – २८ नोव्हेंबर २०२०.
वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना / दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. अंदाजित वेळापत्रकाची सद्यस्थिती दर्शविणारी अद्ययावत माहिती वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच संबंधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात / अधिसूचनेव्दारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies