Type Here to Get Search Results !

शिक्षण विभागाच्या बदनामी मुळे शिक्षक संघटना एकवटल्या; आंदोलनाचा निषेध करीत शिक्षक उद्या लावणार काळया फिती.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
माळशिरस प्रतिंनिधी : शिक्षण विभागाच्या विरोधात सध्या सुरू असलेल्या उपोषणामुळे शिक्षण विभागाची बदनामी होत असल्याच्या निषेधार्थ सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधी नी एकत्र येत माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून शिक्षण विभागाचे कामकाज सुरळीत पणे सुरु असून. गटशिक्षण अधिकाऱ्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत गुणवत्ता लोकवर्गणी आधी बाबतीत शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षक नेहमीच अग्रेसर राहिलेले असताना अशा आरोपामुळे शिक्षण विभागाची बदनामी होत असून याचा निषेधाचे पत्र पंचायत समिती चे सभापती वैष्णवी देवी मोहिते-पाटील व गटविकास अधिकारी स्मिता पाटील यांना देण्यात आले असून या आंदोलना विरुद्ध काळया  फिती लावून निषेध केला जाणार असल्याची माहिती शिक्षकांनी दिली.
सदर आरोपांचा  निषेध करत सध्याचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख यांनी या विभागाचा कार्यभार हाती घेतल्यापासून जिल्ह्यामध्ये माळशिरस  शिक्षण विभागाचा लौकिक वाढला असून अनेक विद्यार्थी जिल्हा स्तरावर पोहोचले आहेत .तर शिष्यवृत्ती, स्पोकन इंग्लिश, स्मार्ट शाळा, अशा बाबतीत उत्कृष्ट काम केले असून इंग्लिश माध्यमाच्या शाळातून २२५ विद्यार्थी झेडपीच्या शाळेत दाखल झाले. याशिवाय गत वर्षात शैक्षणिक उठावाद्वारे  लोकवर्गणीतून १ कोटी २० लाख रुपयाची कामे करण्यात आली आसुन  रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाळांमधली कामे झाली आहेत. तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी शालेय पोषण आहार अधीक्षक अशी एकूण ८ पदे रिक्त असतानाही प्रभारी  गटशिक्षण अधिकार्यांानी शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढवला आहे त्यामुळे उपोषणकर्त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांविरुद्ध  केलेल्या वैयक्तिक टिका टिपणी निषेधार्य असून या गोष्टीचा शिक्षक समन्वय समिती निषेध करीत आहे . यासाठी उद्या सर्व शाळांमध्ये काळया फिती लावून शालेय कामकाजात सहभागी होणार असल्याबाबदचे  निवेदन नुकतेच पंचायत समितीचे सभापती  व गटविकास अधिकारी  यांना देण्यात आले आहे .यावेळी उपस्थीत विष्णू धोत्रे ,गुरुनाथ स्वामी , अशपाक मुलाणी , सुधीर नाचणे , तायाप्पा गोरड , श्रीकांत राऊत सह  समन्वय समीतीचे १९ शिक्षक उपस्थीत होते .
आंदोलनातील पत्रास अनुसरून प्रभारी गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या बाबतीतील आरोपण बाबत वेगळ्याने सविस्तर चौकशी करण्यात येईल येईल सध्या  जिल्ह्यात फक्त तीन गटशिक्षण अधिकारी कार्यरत असून उर्वरित आठ पदे रिक्त आहेत त्यामुळे प्रभारी भार देण्यात आलेला आहे . यांची नियुक्ती शासन स्थरावर होत असल्यामुळे याबाबतीतील उपोषण मागे घ्यावे अन्यथा या या उपोषणाबाबतची  वैयक्तिक जबाबदारी राहील अशा आशयाचे पत्र शिक्षणाधिकारी यांचेकडून पंचायत समितीला आले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies