स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीतील प्राध्यापकांसाठी गेस्ट लेक्चर संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 9, 2019

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसीतील प्राध्यापकांसाठी गेस्ट लेक्चर संपन्न.माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर येथे प्राध्यापकांसाठी गेस्ट लेक्चर घेण्यात आले. मिस्टेअर हेल्थकेअर अँड लिमिटेड, शिरोली (जि.कोल्हापूर) या कंपनीचे इंजिनिअरींग अँड प्रोक्युरमेंट प्रमुख सचिन सपकाळ यांनी सर्व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रास्तविकात प्रा. नाईकनवरे यांनी हे सेमिनार आयोजिन्याचा हेतू स्पष्ठ केला. यावेळी पुढे बोलताना सचिन सपकाळ यांनी इंडस्ट्रीमधील गरज, विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने घडवताना कोण कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याचे महत्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके देताना कोणत्या बाबी समजावून सांगाव्यात?, प्रात्यक्षिके कशी घेतली पाहिजेत?, त्याचे सविस्तर रिपोर्ट लिहिणे, तसेच त्यातून योग्य निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी तसेच याच निष्कर्षांद्वारे संशोधन कसे होते. या बाबी सपकाळ यांनी प्राध्यापकांना पटवून सांगितल्या. पुढे बोलताना सपकाळ म्हणाले, ‘विद्यार्थी बराच वेळ प्रात्यक्षिकासाठी देत असतात. त्यामुळे त्यांना महाविद्यालयातच बर्यानच गोष्टींची माहिती होऊन जाते. याचा उपयोग कंपनीमध्ये काम करताना होतो.’ यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डॉ.मिथुन मनियार, प्रा.वृणाल मोरे, प्रा.प्रज्ञा साळुंखे व प्रा.प्रदीप जाधव यांच्यासह इतर  प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise