Type Here to Get Search Results !

धुळप्रश्नीस सांगोला नगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात; अशोक कामटे संघटना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या मुख्याधिकार्यां ना सुचना.

माणदेश एक्सप्रेस न्यूज 
सांगोला/प्रतिनिधी : सांगोला शहर व उपनगरीत धुळ कमी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच शहरवासियांना धुळीपासून होणारा त्रास कमी करावा, अशा सुचना व निवेदन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत भोसले, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सांगोला नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना देण्यात आल्याची माहिती संस्थापक निलकंठ शिंदे यांनी दिली. 
सांगोला शहर व परिसरात पावसाळ्यानंतर सर्वत्र शहरात धुळीचे लोट उडत असून, शहरातील अर्धवट रस्त्याची कामे, खोदकाम व गावातील रस्ते जीर्ण किंवा अधिक झीज झाल्याने त्यामुळे धुर सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे उठत असून त्यांचा त्रास सर्वच नागरिकांना होत आहे. कचेरी रोड, मिरज रेल्वे गेट, दुर्तफा असणार्याी सर्व परिसर, शहरातील वंदे मातरम् चौक, मिरज रोड, जयभवानी चौक, भोपळे रोड, स्टेशन रोडसह सर्वत्र भागात प्रचंड धुळीचे कायमस्वरूपी सतत लोट उडत असल्याने नागरिकांना फुुुफूसाचे विकार, दमा यासारखे आजार वाढत आहेत. येथील व्यापारी, गृहीणींसह सर्व लोक दिवसातून 3-4 वेळा स्वच्छता करून हैरान होउन मेटाकुटीला आली आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न, वाढत आहे. शहरातील अर्धवट उकरलेले रस्ते, अस्ताव्यस्त पडलेली माती व नगरपालिकेचे दुर्लक्ष त्यामुळे गेल्या 4 महिन्यापासून ही समस्या शहरवासियांना भेडसावत आहे. शहरातील कर आकारून लोकांना चांगले आरोग्य, रस्ते व धुळमुक्त सांंगोला कधी करणार असा प्रश्नह सांगोलावासियांना पडला आहे. तरी यावर उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी अशोक कामटे संघटनेने संबंधित खात्याकडे केली आहे. यावेळी अध्यक्ष संतोष महिमकर, कार्याध्यक्ष अच्युत फुले, उपाध्यक्ष चैतन्य राऊत, यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
चौकट  सांगोला नगरपालिकेस आवश्यक सुचना करून शहरवासियांना धुळीचा त्रास कमी होण्याकरिता नगरपालिकेने कार्यवाही करणे गरजेचे आहे. नगरपालिका हद्दीतील विषय असुन ,सर्व जिल्ह्यात हि समस्या भेडसावत आहे ,याकरिता सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे .याबाबत मुख्याधिकारी व प्रशासनाने शहरातील व उपनगरातील धुळीच्या त्रासाविषयी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
प्रशांत भोसले (महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी,सोलापूर)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies