धनगरसमाजातील आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

धनगरसमाजातील आंदोलकांवरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत.माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड  प्रतिनिधी: धनगर आंदोलकांच्या वरील गुन्हे सरकारने मागे घ्यावेत, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे नेते डॉ.प्रमोद गावडे यांनी केली आहे.
  राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी , राष्ट्रीय कांग्रेस व इतर घटक पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर लोकभावना लक्षात घेत लोकहिताचे निर्णय घेऊन मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनेचा मराठी बाणा दाखवत ज्या प्रमाणे आरे वृक्षतोडी प्रकरणातील आंदोलनकर्ते , नाणार आंदोलनातील कार्यकर्ते,  भिमा कोरेगांव आंदोलकावरील गुन्हे, शेतकरी आंदोलनाच्या दरम्यानचे  खटले  आणि मराठा मोर्चाच्या दरम्यान आंदोलनकर्त्या वरील गुन्हे मागे घेण्याचा ऐतिहासिक निर्णयाची शिफारस घेण्यात आली. तसे धनगर समाज्याच्या आंदोलनकर्त्यावर आरक्षणावरुन झालेले गुन्हे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मागे घेण्याची मागणी वंचित बहूजन आघाडीचे नेते व धनगर समाजाचे प्रतिनिधी डॉ प्रमोद गावड़े  यांनी केली असुन या बाबत लवकरच वंचित आघाडीच्या वतीने निवेदन देणार असल्याचे डॉ प्रमोद गावडे यांनी सांगीतले आहे.
     भाजपा सरकारच्या काळात हक्काच्या मागणी व अन्याय होणार्या घटनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी केलेल्या हजारों आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केल्याने या गुन्ह्यात अनेक शिक्षीत तरुण काम धंद्या पासुन व शासकीय नोकरर्या पासुन वंचित राहुन गुन्हेगारीकडे वळण्याची भिती असल्याने नव्याने सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, कांग्रेस व इतर घटक पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकारने शपथ विधीचा सोहळा संपतोनसंपतो विविध आंदोलनात बेरोजगार युवकांवर तरुणावर व आरक्षणासाठी अथवा मेट्रो रेल्वेसाठी आरे जंगलातील लाखोंवृक्षाची कत्तल थांबवण्यासाठी येथील वृक्षप्रेमी बांधवानी केलेल्या आंदोलनाच्या वेळी भाजपासरकारणे गुन्हे दाखल केले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय , कोकणा मधील कोंकण वासीयांचा नाणार प्रकल्प रद्द करावा यासाठी कोकणवासीयांनी केल्या आंदोलकांवर भाजपा सरकारणे गुन्हे दाखल केले ते हि ठाकरे सरकारने मागे घेण्याची शिफारस केली आहे, त्याच प्रमाणे दलित समाज्यातील व बौध्द समाज्यातील युवक व तरुणांवर भिमाकोरेगांव दगंलीचा ठपका  भाजपने ठेवून सुडबुध्दीने दंगल करणार्यांना वाचवण्यासाठी दलित समाज्याच्या तरुणांवर दंगलीचे खोटे गुन्हे दाखल केले होते ते हि मागे घेण्यासाठी मंत्री जयंत पाटिल यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे , विविध शेती मालाला हमी भाव मिळावा , दरवाढ मिळावी या मागण्यासाठी शेतकरी बांधवानी केलेल्या आंदोलनकर्त्यावर दाखल केलेले गुन्हे , मराठा समाज्याने आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातुन सुडा पोटी भाजपा सरकारने मराठा समाज्यातील तरुणांवर दाखल  केलेले गुन्हे मागे घेण्याची मांगती जोर धरू लागली आहे, मात्र धनगर समाज्याने आरक्षणाच्या मागणी साठी व धनगर समाज्यातील मेंढपाळ बांधवावर विविध कारणासाठी अन्याकारक गुन्हे दाखल केल्याच्या विरुध्द धनगर बांधवानी न्याय मागणीसाठी काढलेले मोर्चे, रस्ता रोको, धरणे आंदोलन केले म्हणून धनगर समाज्यातील तरुण सुशिक्षीत युवकांवर भाजपा सरकारच्या काळात दाखल झालेले गुन्हे शिवसेना, कांग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेबांनी इतर गुन्ह्या प्रमाणे मागे घ्यावेत.
यासाठी लवकरच मुंबई येथे त्यांना भेटून वंचित बहुजन आघाडीच्या  व धनगर समाज बांधवाच्या वतीने निवेदन देवून मागणी करणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे डॉ प्रमोद गावड़े यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment

Advertise