Type Here to Get Search Results !

परळी-धर्मापुरी रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवासी ,नागरिक, वाहनचालक वैतागले ; तत्काळ खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावा-माधव मुंडे.



माणदेश एक्सप्रेस न्यूज 
परळी वैजनाथ प्रतिनिधी : परळी ते धर्मापुरी रस्त्याचे काम मागील वर्षांपूर्वी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करुन पूर्ण केले. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याचे तीन तेरा वाजले. वाहनचालक, शालेय विद्यार्थी व नागरिकांतून संताप व्यक्त होत केला जात आहे. कामाच्या दर्जाबाबत चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे तरी सदर खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे 
अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माधव मुंडे यांनी केली आहे.
गेल्या एक वर्षापासून परळी ते धर्मापुरी या २२ किलोमीटर रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठाले खड्डे पडलेले असल्याने या भागातील ग्रामस्थांना प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचे झाल्यास तारेवरची कसरत करत परळी तालुका गाठावे लागत असत. रस्त्याचे काम व्हावे म्हणून अनेकदा नागरिकांनी शासन दरबारी वारंवार निवेदने दिली. तरी संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्याचे काम करताना संबंधित अभियंत्याने गुणवत्तापुर्वक काम करुन घेणे गरजेचे होते मात्र संबंधित ठेकेदाराला अभियंत्याचाच आशिर्वाद मिळाल्याने ठेकेदाराने रस्त्याच्या कामातील तांत्रिक चुका ठेवुन निकष गुंडाळून ठेवले. तसेच अनेक ठिकाणी या रस्त्यावर वळणाच्या ठिकाणी योग्य स्लुप घेतले नाही. दिशादर्शक फलक देखील लावला नाही. यामुळे वाहने सरळ रस्त्याच्या खाली जाऊन अपघात होत आहेत. या रस्त्याला राष्ट्रीय मार्गाचा दर्जा मिळवला आहे. रात्री-बेराञी देखील वाहनाची वर्दळ राहत आहे. मात्र संपूर्ण रस्ताच खराब झाल्याने वाहनधारकांना या रस्त्यावर वाहने आणल्याचा मनस्ताप होत आहे. हा रस्ता लातूर व परभणी जिल्ह्यासह जोडणारा आहे. सध्या या रस्त्याची ओळख निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना अशी झाली असल्याचे चर्चिले जात आहे.
परळी ते धर्मापुरी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. नागरिक व वाहन धारकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या रस्त्यावर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. याची खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्याचे काम सुरू करावे असे अनेक वेळा नागरिकांनी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आता या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून हा रस्ता जैसे थे झाला आहे. एवढे मोठे बजेट खर्च करुन रस्ता लवकर खराब व्हावा, ही दुर्दैवाची बाब आहे. रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावून तत्काळ रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी माधव मुंडे यांनाही केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies