सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे एक लाखाव्या साखर पोत्याचे पूजन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 27, 2019

सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे एक लाखाव्या साखर पोत्याचे पूजन.


माणदेश एक्सप्रेस न्यूज 
म्हसवड अहमद मुल्ला : सातारा, सांगली व‌ सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील राजेवाडी येथील सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यात यंदाच्या चालू गळीत हंगामात उत्पादन केलेले एक लाखाव्या साखर पोत्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन यापुढील साखर उत्पादनाची घोडदौड सुरु केली.
या एक लाखाव्या साखर उत्पादन पोत्याच्या पूजन कार्यक्रम प्रसंगी संचालक, कारखान्याचे अध्यक्ष खातेप्रमुख,अधिकारी यांच्या वतीने चालू गळीत हंगामातील साखर पोती पूजन प्रसंगी प्रथम कारखान्याचे अध्यक्ष एन.शेषागिरी राव व‌‌ उपाध्यक्ष बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे हस्ते सद्गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे सरव्यवस्थापक नागेश राव,ए जी एम गौरीशंकर, व्यवस्थापक श्री.जाधव, उपव्यवस्थापक अण्णासाहेब शेंडे ,उत्पादन विभागाचे शहाजी पाटील,समीर सय्यद एच.आर.अडमीन,सचिन खटके,श्री.पाटील,श्री.सोलनकर, तानाजी देवकते,अभियंता अवधूत जमदाडे ,सुरक्षा अधिकारी श्री बोडरे ,इलेक्ट्रिक विभागाचे जाधव,ऊस उत्पादक शेतकरी,सभासद कामगार,ऊस उत्पादक ऊस वाहतूर वाहन मालक व चालक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.एन.शेषागिरी राव व‌‌ श्री.बाळासाहेब कर्णवर यांनी कारखान्याच्या साखर उत्पादनाबाबत‌ वेळोवेळी योग्य सहकार्य देऊन योगदान दिलेबद्दल सर्वाचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Advertise