Type Here to Get Search Results !

कॅरेज बाय रोड ॲक्ट व नियमांतर्गत नोंदणी करा अन्यथा कारवाई . उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे

माणदेश एक्सप्रेस न्युज 
सांगली : कॅरेज बाय रोड ॲक्ट, 2007 व कॅरेज बाय रोड नियम, 2011 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र न घेता वाहतूक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर कंपन्या व वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या कुरिअर एजन्सी विरूध्द कारवाई करण्यात येत आहे. संबंधितांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सांगली यांच्याशी संपर्क साधून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून वाहतुकीदरम्यान सदर नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सोबत ठेवावी. विना नोंदणी व्यवसाय व वाहतूक करणाऱ्यावर मोटार वाहन अधिनियम तसेच कॅरेज बाय रोड ॲक्टच्या नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी दिली.
श्री. कांबळे म्हणाले, कॅरेज बाय रोड अधिनियम २००७ च्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या दि. २८ फेब्रुवारी २०११ च्या अधिसूचना नुसार कॅरेज बाय रोड नियम २०११ प्रसिध्द करण्यात आले असून हे नियम अधिसुचना प्रसिद होण्याच्या दिनांकापासून लागू झाले आहेत. हे नियम केंद्र शासनाच्या www.morth.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या नियमानुसार मालवाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/पाकीटे/मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरिअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांनी कॉमन कुरिअर म्हणून क्षेत्रीय नोंदणी प्राधिकारी तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies