Type Here to Get Search Results !

राजू शेट्टीनां कँबिनेट कृषीमंत्री करण्याची मागणी : शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लागले कामाला ; शेतकरी नेते असल्यामुळे कृषिमंत्री पद मिळावे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
माळशिरस/प्रतिनिधी : शेतकरी प्रशनावर मोदी सरकारवर टिकेची झोड उठवणारे व भारतीय जनता पक्षात मेघा भरती होत असताना शेतकरी विरोधी धोरण मोदी सरकार राबवते असा घरचा आहेर देत भाजपची साथ सोडणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा.राजु शेट्टी यांना राज्याच्या मंत्रीमंडळामध्ये स्थान देवून त्यांना कँबिनेट कृषीमंत्री पदी त्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरू लागली असून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते त्यांना मंत्रीपद मिळावे यासाठी जोर धरू लागले आहेत.
लोकसभेत मोदींच्या नजरेला नजर भिडवून बोलायची आजही कुणाची ताकद नाही मात्र राजु शेट्टींनी पाच वर्षे मोदी सरकार सळो कि पळो करून सोडले. याची किमंत देखील त्यांना मोजावी लागली व त्यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर घरोबा केला. मात्र  नुकतंच राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे प्रमुख व इतर मित्र पक्ष आहे त्यात राजू शेट्टी यांची स्वाभिमानी विकास आघाडी देखील सामील आहे. सध्या या तीनही मोठया पक्षांनी स्वतःच्या सत्तेतील वाटा निश्चित करून घेतला. अर्थात त्यात काही गैर नाही म्हणूनच आघाडी सरकार मध्ये राजु शेट्टींना कँबिनेट कृषीमंत्री अरा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याकडुन होत आहे.
शेतकरी प्रश्न ज्यांना कळतो, गेली 25 वर्षे शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलन केली. अनेक वेळा जेल मध्ये जावे लागले. सध्या राजु शेट्टी यांचे ऐकून मत देणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग वर्ग आहे. आघाडी  सरकार मध्ये कृषीमंत्री पद कोणाला? तर  निश्चितपणे यात राजू शेट्टी हे एकमेव नाव समोर येतं. याचं कारण गेली पाच वर्षे भाजप सरकार विरुद्ध रान पेटवण्याचं काम स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यानी राज्यभर केलं. ऊस दर आंदोलन, बोंड अळी आंदोलन, पीक विमा घोटाळा, दूध आंदोलन, कडकनाथ कोंबडया मुख्यमंत्र्याच्या ताफ्यावर फेकण्या पर्यंत स्वाभिमानी रस्त्यावर एकटी झुंजत राहिली. ऐतिहासिक शेतकरी संपातही स्वाभिमानीचे  पदाधिकारी व कार्यकर्ते अग्रभागी होते व स्वतः राजू शेट्टी केवळ राज्यातच नव्हे तर देशाच्या पातळीवर अनेक शेतकरी संघटना एकत्र करून गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यावर स्वतः लढत आहे.
त्यामुळे राजू शेट्टी सारख्या अभ्यासू व लढाऊ नेत्याकडे कृषीमंत्री पद द्यावं. ही राज्यातील सगळ्या सामान्य शेतकऱ्यांची इच्छा आहे. रस्त्यावर राजू शेट्टींसह अनेक वर्षे शेतकऱ्यांसाठी कार्यकर्त्यांनी जे रक्त सांडले त्यांचा तो हक्क आहे तो मिळालाच पाहिजे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होत आहे.
राज्यात सत्ता येण्यामध्ये राजू शेट्टी यांचा महत्वाचा वाटा आहे. तसेच स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांनी राज्याचे तत्कालीन कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा पराभव केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना  राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृषिमंत्री पद मिळावे.
राहुल बिडवे 
शेतकरी नेते माळशिरस

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies