कला व विज्ञान महाविद्यालयाचे बनपुरीत श्रमसंस्कार शिबीर दि. २३ ते २९ पर्यंत आयोजन ; गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांचे हस्ते उद्घाटन . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

कला व विज्ञान महाविद्यालयाचे बनपुरीत श्रमसंस्कार शिबीर दि. २३ ते २९ पर्यंत आयोजन ; गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांचे हस्ते उद्घाटन .

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व श्रीराम बहुउददे्शिय सेवाभावी संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय,आटपाडी यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे; विशेश श्रमसंस्कार शिबीर सोमवार 23 डिसेंबर 2019 ते रविवार 29 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये मौजे बनपुरी येथे संपन्न होणार आहे. या शिबीराचे उद्घाटन पंचायत समिती आटपाडीचे गटविकास अधिकारी मधुकर देषमुख यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बजरंग काबंळे हे उपस्थित राहून विद्यार्थांना मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील उपस्थित राहणार आहेत.
या सात दिवसाच्या शिबीरामध्ये मौजे बनपुरी येथे शोषखड्डे,  वृ़क्षलागवडीसाठीचे खड्डे,  अंतर्गत स्वच्छता, आरोग्य शिबीरे, प्रबोधनात्मक व्याखाने यांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ भारत, स्वस्थ भारत’ हे ब्रीद्रवाक्य लक्षात घेवून प्लास्टिक निमूर्लन, भारतीय संविधान, जलसंवर्धनाचे महत्व, भ्रष्टाचार निमुर्लन  यासारख्या कार्यक्रमाची आयोजन करण्यात आलेले आहे. याकामी बनपुरीच्या सरपंच सौ.सुनिता महादेव पाटील व सर्व सदस्य, ग्रामसेवक तसेच मान्यवर व्यक्तीचे समाजसेवकांचे सहकार्य लाभणार आहे.
तर रविवार 29 डिसेंबर 2019  रोजी शिबीराची समारोप संमारभ होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ उपस्थित राहणार असून कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सौ.सुनिता महादेव पाटील ह्या आहेत. तसेच आजी, माजी सदस्य ग्रामपंचायत बनुपरी व विकास सोसायटीचे सदस्य, सेवानिवृत्त शिक्षक व माजी विद्यार्थी, समाजसेवक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा.बालाजी वाघमोडे व संतोष सावंत हे आहेत.
या शिबीर कालावधीत डॉ. डी.के.गायकवाड कार्यक्रम समन्वयक शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, तानाजीराव पाटील अध्यक्ष श्रीराम बहुउददे्शिय सेवाभावी संस्था, शिवाजीराव पाटील सचिव, श्रीराम बहुउददे्शिय सेवाभावी संस्था सचिन लंगुटे तहसिलदार आटपाडी, प्रा.सदाशिव मोरे जिल्हा कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय योजना सांगली हे भेटी देणार आहेत. अशीमाहिती कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Advertise