आटपाडीत खंडोबा यात्रा संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, December 3, 2019

आटपाडीत खंडोबा यात्रा संपन्न.

आटपाडी/प्रतिनिधी :  “येळकोट येळकोट खंडोबाच्या नावाने चांगभले” जयघोषाने बाजार पटांगण परिसर दुमदुमून गेला. आटपाडीत काल खंडोबा यात्रा उत्साहात व धार्मिक भावनेने पार पडली. 
बाजार पटांगण चौकात खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात यात्रेनिमित्त विद्युत रोषणाई केली होती. दिवसभर दर्शनासाठी भाविकांनी रांग लावली होती. घटस्थापनेचा काल सांगता समारंभ होता. ब्राह्मण व लिंगायत समाज बांधवाने येळकोट येळकोट घे, खंडोबाच्या नावाने चांगभले असा जयघोष करीत ब्राह्मण गल्ली लिंगायत गल्ली येथून फेरी काढली. यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते.
 खंडोबा मंदिरात आरती करण्यात आली. घटस्थापने निमित्त महिलांनी उपासना केली. त्याचा सांगता झाली महिलांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. आटपाडीतील रामोशी गल्लीत खंडोबाचे मंदिर आहे. या मंदिरात यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम पार पडले. बाजार पटांगणातील खंडोबा मंदिर, काळा मारुती मंदिर, रामनाथ मंदिर, दत्त मंदिर, कोळेकर महाराज मठात जाऊन आरती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Advertise