स्वाभिमानी विकास आघाडीचा आटपाडीत जल्लोष . - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

स्वाभिमानी विकास आघाडीचा आटपाडीत जल्लोष .

माणदेश एक्स प्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते जयंतराव पाटील साहेब यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर शहरांमध्ये स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एसटी स्टँड, कलेश्वर मंदिर, वरदान चौक, चावडी, बाजार पटांगण, थिएटर चौक, पोलीस स्टेशन चौक इ. ठिकाणी आऊट  व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला तर सर्वांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सायंकाळी सहाच्या दरम्यान सर्व कार्यकर्ते एसटी स्टँडवर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमा झाले होते. जयंत पाटील साहेबांनी मंत्री पदाची शपथ घेताच एकाच वेळी सर्वांनी जल्लोष केला. जयंत पाटील साहेबांचा विजय असो, असा नारा देत व्यापारी पेठ दणाणून सोडली. यावेळी भारत पाटील यांचे समर्थक माजी ग्रा.प. सदस्य चंद्रकांत दौंडे, माजी सरपंच अभिमन्यू विभूते, सुनील बाबर, जितेंद्र जाधव, बाळासाहेब सागर, बाळासो पाटील, सिद्धेश्वर लवटे, किरण मिसाळ, अतुल यादव, गणेश जाधव, दगडू काळे, जुनेद पांढरे, पप्पू नांगरे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise