तरुणीला आत्महत्येची धमकी देणाऱ्या रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 11, 2019

तरुणीला आत्महत्येची धमकी देणाऱ्या रोडरोमिओ विरोधात गुन्हा दाखल.


आटपाडी/प्रतिनिधी : गेल्या काही दिवसापासून लग्न कर किंवा आत्महत्या करेन म्हणून धमकी देणाऱ्या दोन रोडरोमिओ विरोधात सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवतीने आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
गेल्या तीन महिन्यापूर्वी संबंधीत तरुणी आणि तिची मैत्रीण आटपाडीला सायकलवरून महाविद्यालयासाठी येते. कॉलेज परिसरातील असणाऱ्या हॉटेलमध्ये त्या नाष्टा करीत असताना आरोपी साहिल ज्ञानेश्वर खरात आणि अरुण दगडू वंगवरे रा. लोणारवाडी बोंबेवाडी यांनी त्यांचे कोणालाही न समजता मोबाईल मध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत होते. तसेच तरुणीना वाटेत अडवून विवाह कर अन्यथा आम्ही आत्महत्या करेन अशी धमकी ते देत होते. परंतू त्यांच्याकडे  संबंधित तरुणीने प्रतिसाद दिला नाही. तरीही या रोडरोमियोनी त्यांचा पिच्छा सोडला नाही. त्यामुळे अखेर रोडरोमीचया त्रासाला कंटाळून त्यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात संबंधित तरुणीने तक्रार दाखल केली.

No comments:

Post a Comment

Advertise