जागतिक एड्स दिनानिमित्त आज जनजागृती प्रभात फेरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

जागतिक एड्स दिनानिमित्त आज जनजागृती प्रभात फेरी.

माणदेश एक्सप्रेस न्युज
 सांगली : जागतिक एड्स दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती सांगली मार्फत दि. १ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ८.३० वाजता एच.आय.व्ही. एड्स जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय, सांगली येथे करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.
या वर्षाचे घोषवाक्य तुमची स्थिती माहिती करून घ्या हे आहे. एच.आय.व्ही. / एड्स प्रादुर्भाव व प्रतिबंध या विषयाची जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे.

No comments:

Post a Comment

Advertise