२३ डिसेंबर रोजी, दहिवडे व फुटाणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

२३ डिसेंबर रोजी, दहिवडे व फुटाणकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार.


माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड प्रतिनिधी: म्हसवड येथील सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे सेवक जगन्नाथ दहिवडे व अमीर फुटाणकर हे  सोमवार दि. २३ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहे. 
या निमित्ताने  शाळेच्या वतीने या दोघांचा भव्य सत्कार दि.२३ रोजी ,दुपारी १२ वाजता शाळा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिध्दनाथ हायस्कूल सेवक व स्कूल कमिटी तर्फे करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष  मा. अजितराव राजेमाने यांच्या हस्ते या दोघाचा सत्कार करण्यात येणार आहे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कुल कमिटी उपाध्यक्ष पृथ्वीराज राजेमाने,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कुल कमिटी सदस्य नितीन शेठ दोशी,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कुल कमिटी सदस्य संभाजी माने,गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कुल कमिटी सदस्य विपुल दोशी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व स्कुल कमिटी सदस्य. राजेमाने,
प्राचार्य मधुकर नाळे,उप प्राचार्य रुक्साना मोकाशी, पर्यवेक्षक लता शिंदे,सिध्दनाथ सालकरी सुनील किर्तने, सिध्दनाथ मठाधिपती रविनाथ महाराज व शिक्षक ,सेवक,व प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise