घेरडी वनविभागात ओसाड माळरानावर फुलली वनराई. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

घेरडी वनविभागात ओसाड माळरानावर फुलली वनराई.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
घेरडी : सांगोला वनपरिक्षेत्रातील असलेल्या वाणीचिंचाळे, आगलावेवाडी, घेरडी, पारे या गावात वनविभागाच्या क्षेत्रावर लागवड केलेली वनसंपदा झालेल्या समाधानकारक पावसाने फुलली आहे. यामुळे या परीसरात सर्वत्र हिरवळ दिसु लागली आहे.
 यापूर्वी या क्षेत्रात फक्त ओसाड माळरान होते. यावर वनविभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच पडलेल्या समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने हा परीसर हिरवा शालू नेसल्याप्रमाणे दिसून येत आहे. तसेच अनेक वन्यप्राणी दिसून येत आहेत यामुळे वनविभाग कात टाकत आहे.
 या वृक्ष लागवड करण्यासाठी वनपाल खंडेभराड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बादने तसेच वनमजुर कोरे गायकवाड, मिसकर, गावडे हे परिश्रम घेऊन हि वनसंपदा जपण्याचे काम करत आहेत. यामुळे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी अनेक तरुण अधिकारी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तसेच अजूनही या विभागात वनसंपदा वाढविण्यासाठी अजून प्रयत्न करावेत अशी अपेक्षा वन्यप्रेमी व निसर्गप्रेमीकडून होत आहेत. तसेच या गावातील अनेक ग्रामस्थ व वन समितीचे  सदस्य  या वृक्ष लागवड मोहीमेत जोडल्यामुळे हा परीसर हिरवागार दिसून येत आहे. परंतु या परिसरात असणाऱ्या जागरूक नागरिकांनी या क्षेत्रात कोणत्याही प्रकारची मोकाट गुरेचराई करू नये. तसेच या परिसरात आग वगैरे घटना घडु नयेत याची काळजी घ्यावी तसेच असे दिसून आल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले. जर झाडे जगली तरच आपण सर्वजण जगु हे लोकामध्ये पटवून दिले तर आपल्या परीसरात मोठ्या प्रमाणात झाडे वाढतील.
वनविभागाच्या वतीने अतिशय सुंदर अशा वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येतो. तो प्रत्येक विभागात साजरा करावा. तसेच यामध्ये स्थानिक पातळीवरील वन्यजीवप्रेमी व निसर्गप्रेमीना जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी करून हि लोकचळवळ म्हणून झाली तर वनेही वाढतील व पर्यावरण संवर्धनही होईल.तसेच या क्षेत्रातील सर्व वनक्षेत्र अतिशय चांगल्या प्रकारे वाढले आहे .त्यामुळे हा परीसर रमणीय व निसर्गरम्य दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Advertise