पुरंदावडेत यल्लमा देवीची यात्रा उत्साहात साजरी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, December 23, 2019

पुरंदावडेत यल्लमा देवीची यात्रा उत्साहात साजरी.माणदेश एक्सप्रेस न्युज
सदाशिवनगर/वार्ताहर :  पुरदांवडे ता. माळशिरस येथील जागृत यल्लमा देवीची यात्रा रविवार दि. ८ ते मंगळवार दि. १० या तीन दिवसात मोठया उत्साहात साजरी करण्यात आल्याची माहिती माहिती देवीच्या पुजारी जगुबाई मोहिते यांनी दिली.  यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्याची गंधवटी व लिंबा गंधाचा कार्यक्रम झाला व सध्यांकाळी जनजोगती व वाघेमंडळ पार्टी यांचा बहरदार देवीच्या गाण्याचा कार्यक्रम पार पडला. यात्रेच्या तिसऱ्या दिवसी सकाळी ८ वाजले पासुन देवीच्या  पालखीची व रथाची भव्य मिरवणुक पुर्ण गावातुन काढण्यात आली. तसेच सायंकाळी ४ वाजता किचाचा (होम) कार्यक्रम नानासाहेब पिसे यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील, सरपंच देवीदास ढोपे, उपसरपंच पोपट गरगडे, सदस्य संतोष शिंदे, शिवराज निंबाळकर, भगवान पिसे, महादेव बोराटे,श्रीरंग नाळे उपस्थित होते.

सदरची यात्रा देवीच्या पुजारी जगुबाई माहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुजारी शिवाजी मोहिते, दादा मोहिते, आदित्य मोहिते, बाळु केंगार, संजय भुजबळ, नारायण कुभार, पिंटु भुजबळ, विलास कुंभार संपन्न झाली. यात्रेसाठी पुरदांवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment

Advertise