प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अहिंसा पतसंस्थेचे काम नेत्रदीपक - आ.बाळासाहेब पाटील. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, December 13, 2019

प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतही अहिंसा पतसंस्थेचे काम नेत्रदीपक - आ.बाळासाहेब पाटील.

माणदेश न्युज:  
म्हसवड अहमद मुल्ला: येथे श्री सिद्धनाथांचे दर्शनास आले असता आ.बाळासाहेब पाटील यांनी अहिंसा पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आ.पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व म्हसवड चे माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी स्वागत केले. आ.पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली, यावेळी बोलताना ते म्हणाले की माण तालुक्यात अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असतानासुद्धा आशा परिस्थितीत सुद्धा नेत्रदीपक अशी कामगिरी अहिंसा पतसंस्थेने केलेली असून पुढे ते म्हणाले की, अहिंसा पतसंस्था ही केवळ बँकिंग न पाहता सामाजिक , शैक्षणिक, क्रीडा,जलसंधारण या कामात ते सातत्याने अग्रेसर आहे. केवळ पतसंस्था व व्यवहार न पाहता सामाजिक बांधिलकी खऱ्या अर्थाने जपण्याचे महत्वपूर्ण काम पतसंस्थेने केले आहे. पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.  यावेळी म्हसवडचे माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी,संस्थेचे व्हा.चेअरमन अजित व्होरा,संचालक प्रीतम शहा, अण्णासाहेब माने,मोहक व्होरा इ.मान्यवर व पतसंस्थेचे कर्मचारी आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise