नागेश चांडोले “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित : मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून गौरव ; शैक्षणिक कार्याची संस्थेची घेतली दखल. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, December 4, 2019

नागेश चांडोले “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित : मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून गौरव ; शैक्षणिक कार्याची संस्थेची घेतली दखल.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : लोणारवाडी बोंबेवाडी गुरुकुलचे मुख्याध्यापक नागेश चांडोले यांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मातोश्री बहुउद्देशिय सामाजिक व शैक्षणिक संस्था बोंबेवाडी यांच्यावतीने " आदर्श शिक्षक  " पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. सदरचा पुरस्कार विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये त्यांना संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेजाळ,  जयंत पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजीबापु जाधव, नामदेव घेरडे, हणमंत करांडे, दिनकर करांडे, दैवत काळेल, सचिन चांडोले, मच्छिंद्र शेजाळ, पाडुरंग शेजाळ यांच्या हस्ते त्यांना सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
यावेळी बोलताना नागेश चांडोले म्हणाले, सदरचा पुरस्कार हा पालक, मित्र परिवार, शिक्षक स्टाफ, विद्यार्थी यांचा सन्मान आहे. मातोश्री सेवाभावी संस्थेने माझ्या कार्यांचे अचुक मुल्यमापन केले त्यामुळेच मी सदरच्या पुरस्कराचा मानकरी ठरलो आहे. या पुरस्कारामुळे मला पुढील  शैक्षणिक कार्यास प्रेरणा मिळेल. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise