माणदेश मॅराथॉन स्पर्धेचे सुवर्ण क्षण पाहण्याचे साक्षीदार व्हा- डॉ.संदेश गलंडे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

माणदेश मॅराथॉन स्पर्धेचे सुवर्ण क्षण पाहण्याचे साक्षीदार व्हा- डॉ.संदेश गलंडे.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/प्रतिनिधी : माण खटाव तालुक्यात माणदेश मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आले आहे. या स्पर्धेचे सुवर्ण क्षण पाहण्याचे साक्षीदार व्हा यासाठी गोंदवले वडूज रस्त्यावर होणाऱ्या स्पर्धा पाहण्यासाठी आज दि. १ डिसें. रोजी सकाळी ६ ते १० वेळेत उपस्थित राहा असे आवाहन वडूज रनर्स असोसिएशनचे संयोजक डॉ.संदेश गलंडे यांनी केले. 
दहिवडी ता. माण येथील माण पंचायत समितीच्या बचत भवनात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी माण खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे, दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, डॉ.प्रदीप पालवे, डॉ करणे, डॉ बोराटे,डॉ दिलीप पोळ, डॉ मनोज काटकर, डॉ कुलकर्णी सिद्धार्थ गुंडगे, आरोग्य,कला, क्रीडा क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.गलंडे म्हणाले, आम्ही या स्पर्धा दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर भरवत आहोत. वडूज रनर्स या संस्थचे रजिस्ट्रशन करण्यात आले असून या संस्थेचे देशात २५  तर राज्यात ७ व्या क्रमांकाने नोंद झाली आहे. या स्पर्धेत २१ किलोमीटर साठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील १०५४, २ व ५ किलोमीटर साठी ३००० धावपटू नोंद होऊन नोंदणी पूर्ण झाली आहे. गोंदवले, दहिवडी, पिंगळी, मांडवे मार्गे वडूज पर्यंत धावणार आहेत.
दरम्यान प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे-सोनवणे यांनी माणदेशी मॅराथॉन स्पर्धा कालावधीत विना अडथळा व सुरळीत पार पाडण्यासाठी १ डिसेंबर रोजी सकाळी सकाळी ६ ते ७ या कालावधीत वाहतूक वळविण्यासंदर्भात पर्यायी मार्ग नियोजनाचे पत्र दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. त्यानुसार म्हसवड मार्गे येणारी वाहने खांडसरी चौक येथून कातरखटाव मार्गे वडूज, सातारा मार्गे येणारी वाहने महिमानगड येथून येथून बिदाल मार्गे दहिवडीकडे, फलटण कडून येणारी वाहने पावतका ( शिंगणापूर चौक दहिवडी मध्ये) शेवरी, राणंद, मार्डी मार्गे म्हसवडकडे वळविण्यात येणार आहेत.
नियोजन बैठकीला दहिवडी महाविद्यालयाचे एनसीसी प्रमुख श्री. माने, महात्मा गांधी कॉलेजचे प्राचार्य बी.एस.खाडे, नवचैतन्य माध्यमिक विद्यालय, आश्रमशाळा गोंदवले, प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी, मेरीमाता विद्यालय पिंगळी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. धावपटूंच्या स्वागतांसाठी ठिकठिकाणी या शाळांचे झांजपथक, बँडपथक, लेझीम पथक सज्ज असणार आहेत, तसेच शिस्तीसाठी जागोजागी स्वयंसेवक नेमण्यात येणार आहेत. आपतकालीन अडचणीसाठी चार रुग्णवाहिका  व डॉक्टरांची पथके असणार आहेत. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise