डॉ पिंजारी यांचे ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषदेवर निवड. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, December 1, 2019

डॉ पिंजारी यांचे ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषदेवर निवड.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड/अहमद मुल्ला : आपल्या माणदेशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जाणारे शात्रज्ञ डॉ दिपक विठ्ठल पिंजारी यांची ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषदेवर निवड करण्यात आली असून हा पुरस्कार मिळणारे ते ह्यावर्षीचे एकमेव महाराष्ट्रीयन आहेत. 
ब्रिक्स देशामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांचा समावेश आहे. ब्रिक्स देश एकमेका देशाला तंत्रज्ञान, सुरक्षा, औधोकीक विकास, ऊर्जा क्षेत्र, पाणी इत्यादी मदत करण्यास कटीबद्ध आहेत. ब्रिक्स युनियन मध्ये जगाची एकूण ४२ टक्के लोकसंख्या राहते त्यामध्ये ६५ टक्केच्या वर तरुण वर्ग राहतो. जगाच्या भांडवलापैकी ३२ टक्के भांडवल ह्या पाच देशामध्ये आहे. जागतिक बँकेने ब्रिक्स देशाचा विकासदर ५.३ टक्केच्या वर राहील अशी घोषणा केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष  आणि ह्यांच्या संकल्पेतून ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषद चालू करण्यास सर्व देशानी पुढाकार घेतला. प्रथम परिषद बेंगलोर (भारत), तर चौथी परिषद रिओ दे जनेयरो (ब्राझील) येथे पार पडली. 
ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषदेने संशोधन आणि नाविन्यपूर्ण माध्यमातून सामान्य सामाजिक आव्हाने सोडविण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करण्यासाठी एक नेटवर्क तयार केले आहे. ब्रिक्स तरुण शात्रज्ञ परिषदेने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सर्जनशील तरुणांचा समूह तयार केल्यामुळे विज्ञान, अभियांत्रिकी आणि इतर अनुशासनाच्या क्षेत्रातील संशोधन आणि विकासाला भरीव प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही बदलांना गती देऊन, परिषदेने ब्रिक्स नेतृत्व (ब्रिक्स तरुण शात्रज्ञ संघटना) तयार केले आणि त्याच्या क्षेत्रीय एसटीआय (Science, Technology, Innovation) धोरणे, युवा कौशल्य विकास आणि उद्योजकता यांना अधिक बळकटी दिली आहे. 
ब्रिक्सच्या माध्यमातून डॉ पिंजारी यांना ब्रिक्स समूहातील हजारो तरुण संशोधक, शात्रज्ञ आणि विद्यार्थी ह्यांचाशी सहयोग (Collaboration) करून नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्यावर आधारित असणारी पदार्थ कमी वेळेत, कमी पैशामध्ये बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
डॉ पिंजारी हे माणदेशात घडलेले एक रत्न असून आतापर्यंत त्यांना अनेक जागतिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये जागतिक तरुण शात्रज्ञ पुरस्कार, चीन सरकारचे संशोधनासाठी पुरस्कार, अमेरिकन सरकारची फूलब्राईट (Fulbright) फेलोशिप, इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. डॉ पिंजारी सध्या भारताच्या पंतप्रधानांचे  शास्त्रीय सल्लागार डॉ के.विजय राघवन यांच्या कमिटीमध्ये ऊर्जा आणि पाणी क्षेत्रामध्ये त्यांना मदत करत आहेत. म्हसवडचे स्थायिक असणारे डॉ पिंजारी हे मुळात केमिकल अभियांत्रिक आहेत आणि त्यांचे शिक्षण मुंबई येथील प्रतिष्ठित असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजी येथे झाले आहे. सध्या ते भारत सरकारचे शात्रज्ञ व प्राध्यापक म्हणून मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स आणि नॅनोटेकनॉलॉजी काम करत आहेत. त्यांच्या नावावर ७ पेटंट असून ८० च्यावर शोधनिबद्ध आंतराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत आणि २४०० पेक्षा जास्त वेळा जगामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. डॉ पिंजारी यांच्या यशाबद्दल त्यांना समाजाच्या सर्व स्थरातून स्वागत करण्यात येत आहेत.

No comments:

Post a Comment

Advertise