म्हसवड रेणुका माता यात्रा 24 डिसेंबर रोजी. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

म्हसवड रेणुका माता यात्रा 24 डिसेंबर रोजी.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
म्हसवड प्रतिनिधी : येथे दिनांक रविवार 22 रोजी पासून सुरु होत आहे. सालाबाद प्रमाणे रेणुका देवीची यात्रा होणार आहे, मुख्य दिवस मंगळवार दि.  24 रोजी आहे. 24 डिसेंबर रोजी रेणुकामातेचा होम  होणार आहे आणि या होमासाठी अनेक भाविक उपस्थित असतात, या यात्रेसाठी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रेणुकामातेचे पुजारी राघू बाबा पुजारी यांनी केलेला आहे , 22 रविवारी सांयकाळी देवीची पालखीतून मिरवणूक सांयकाळी जोगती यांचा गाण्याचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी 23 रोजी देवी ला पहाटे अभिषेक, देवीचे गंध व ओटी भरणे, लिंब नेसणे. महाप्रसाद सकाळी ९ -रात्री ९ वाजेपर्यंत, सांयकाळी ७ वा. देवीचा छबिना होणार आहे.रात्री करणुकीचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 24 रोजी सकाळी ७-१२ पालखी मिरवणूक,८-१२ महाप्रसाद,१ वाजता होम (किच) होणार आहे. दुपारी ३ वाजता मंदिराचे दार बंद करण्यात येणार आहे. गुरुवार दि.२६ रोजी पहाटे ५ वाजता देवीचे दरवाजे उघडणे. ९-१०  हैम शांती होणार आहे. सायंकाळी पालखी मानाच्या मानकऱ्यांच्या घरी मुक्काम करते.
सुमारे आठशे वर्षांपासून म्हसवड येथे ही रेणुकामातेचे यात्रा भरते प्राचीन काळचे येथे मंदिर आहे महानदीच्या तीरावर हे मंदिर  बांधण्यात आलेला आहे म्हसवड येथील हि देवी यल्लमा देवी  नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे , दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात या आमोशाला येथे यात्रा भरते आणि महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या राज्यातील भाविक येथे आपले नवस फेडण्यासाठी येतात,
रोजी दुपारी एक  वाजता देवीचा होम होणार आहे या अग्नी होमा मधून पुजारी रागोबा पुजारी दरवर्षी रोमा तून चालत जातात तिसऱ्या दिवशी होमाची शांती करण्यात येते या दिवशी शहरातून पालखीचे भव्य मिरवणूक काढून पालखी उत्सव साजरा केला जातो परिसरातील भाविकांनी या यात्रेसाठी यावे आणि देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे,

No comments:

Post a Comment

Advertise