संभाजीशेठ पाटील यांना विशेष पुरस्कार जाहीर ; 16 जानेवारीला तुळापुर येथे होणार सन्मान. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, December 5, 2019

संभाजीशेठ पाटील यांना विशेष पुरस्कार जाहीर ; 16 जानेवारीला तुळापुर येथे होणार सन्मान.

माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील प्रसिद्ध गलाई व्यवसायिक संभाजीशेठ पाटील यांनी केलेल्या सामाजिक  कार्याबद्दल 16 जानेवारी शंभू राज्याभिषेक सोहळा तुळापुर जिल्हा पुणे येथे सार्वजनिक क्षेत्रातील विशेष पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला आलेले संभाजीशेठ पाटील यशाची उंच शिखरे गाठत आहेत. त्यांना लाभलेले यश त्यांनी केलेले निस्वार्थी प्रामाणिकपणाने सामाजिक कार्य  बद्दलची पोचपावतीच आहे. घरची परिस्थिती बिकट असताना कमी वयातच रोजगाराच्या शोधात गाव सोडले. प्रामाणिक काम करत सराफ, गलाई व्यवसायात आपल्या नावाचा ठसा उमटविला. त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे आटपाडी तालुक्यात वेगळे वलय निर्माण केले. आपल्या कार्याचा विविध क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून ठसा उमटवला. त्यांनी तमिळनाडू करंगल लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य, वार्ड क्रमांक दोन मध्ये स्वखर्चातून स्वच्छता अभियान, लोकांना फिल्टरचा थंड पाण्याची सोय, सामाजिक उपक्रमांना मदत, प्रबोधनात्मक व्याख्याने, रक्तदान शिबिर, वाढदिवसा निमित्त  फळे वाटप, लहान मुलांना शालेय उपयुक्त साहित्य असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेली आहे.
सांगली येथे   वृद्धाश्रमात आर्थिक मदत करून गरजूंना दैनंदिन जीवनात उपयुक्त असे साहित्य वाटप केले आहे. उत्तरेश्वर यात्रेनिमित्त मसाला दूध वाटप केले आह. दि. 16 जानेवारी २०२० रोजी तुळापुर येथे शंभु राज्याभिषेक सोहळा दिवशी त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Advertise