काळुबाईची यात्रेसाठी प्रशासन सज्ज; 10 जानेवारी मुख्य दिवस. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, December 21, 2019

काळुबाईची यात्रेसाठी प्रशासन सज्ज; 10 जानेवारी मुख्य दिवस.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
लोणंद प्रतिनिधी: महाराष्ट्राचे आराध्य दैवत काळूबाई देवीची यात्रा 9 जानेवारी ते 24 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रा काळामध्ये अनुचित प्रकार घडू नये यासाठी व शांततेत यात्रा संपन्न होण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे.
यात्राकाळात कोणत्याही ठिकाणी पशुहत्या बंदी केली आहे.याचे उल्लंघन केल्यास पोलीस दल व प्रशासन योग्य ती काळजी घेणार आहे. तरी यात्राकाळात भाविकांनी कोणतेही चुकीचे कृत्य करू नये.
यात्राकाळात कोणतेही वाद्य  वाजवण्यास बंदी आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 36 लागू करण्यात आले आहे.
ध्वनी प्रदूषणाचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन व्हावे. यासाठी सर्व निर्देश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. तरी भाविक ग्रामस्थ यांच्या समन्वयातून यात्रा मध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise