तोंडोली येथे ठेकेदाराने फोडला टेंभूचा कालवा ; गावात शिरले पाणी ; लाखो रुपयांचे नुकसान - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, November 16, 2019

तोंडोली येथे ठेकेदाराने फोडला टेंभूचा कालवा ; गावात शिरले पाणी ; लाखो रुपयांचे नुकसान
माणदेश एक्सप्रेस न्युज 
तोंडोली/वार्ताहर : तोंडोली (ता.कडेगाव) येथील टेंभूच्या पाचव्या किलोमीटर वर ठेकेदाराने अर्ध्या किलोमीटर वरती दोन ठिकाणी टेंभूचा कालवा मध्ये भराव टाकून बंद केला होता. टेंभूच्या पाचव्या किमी पासून पाटाचे अंतर्गत प्लास्टर, अस्तरी करणाचे काम सुरु आहे. ते काम वेळेत पुर्ण करण्यासाठी ठेकेदार नाना प्रकारच्या युक्त्या लढवित आहेत. यामध्ये गाडेकर वस्तीवरील एका लघू पाटा द्वारे पाणी गावातील अंबिकामंदिरा समोरील गटारी द्वारे खटकाळी तलावामध्ये जाते होते. तर दुसऱ्या ठिकाणी पाट तूंबल्याने कालव्यामधील राहिलेले पाणी  लांडगेवाडी हद्दीतील अंबिका ओढ्यातून अंबिका मंदीरा समोररील ओढ्याला मिळते. यामध्ये लांडगेवाडी वस्तीवरुन येणारे पाणी कमी जात असल्याने राहीलेले पाणी अस्तरीकरण करीत असलेल्या ठिकाणी जात होते. त्यामुळे काम रखडले होते. पाट तूंबल्यामुळे दोन-तीन किलोमीटर पाणी साटल्याने कालवा भरला होता. कालव्यामधील मोठमोठी झाडे, झूडपे ऊगवल्याने  पाटातून पाणी पाझरत होते. रखडलेले काम सुरु करण्यासाठी ठेकेदाराने दुसऱ्या ठिकाणी भरावा टाकलेल्या ठिकाणीच्या पाठी मागून कालवा फोडून पाणी अंबिका ओढ्यातून सोडून दिले होते. 
यामुळे गाडेकर वस्तीवरील भरावा अचानक फुटल्याने दोन्ही पाणी फोडलेल्या ठिकाहून जाऊ लागल्याने पाटाला मोठे भगदाड पडलयाने अंबिका ओढ्याने ते गावात घूसले यामध्ये अंबिका मंदिरातील अन्नदान इमारतीतील साहीत्य, गोडाऊन मधील मंदिर बांधकामाचे साहित्य, मंदिर तळघरातील साहित्य तसेच मंदिरा समोरील बांधकामाची वाळू वाहून गेलेली आहे. अचानक आलेल्या पाण्याने गावकरी गोंधळून गेले होते. अंबिका मंदिर परीसर जलमय झाल्याने तोंडोली ऊपाळे-मायणी व तोंडोली-सासपडे संपर्क तुटला होता. तसेच ओढ्याकडेच्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीतून काही राहीलेली पीके भूईसपाट झाली तर काही ठिकाणी ओढ्याकडेचे बांध फुटल्याने पाणी शेतात घुसले.
चौकट
अचानक पाणी गावात घुसल्याने अंबिका मंदिरासमोर परीसरातील नागरीकांनी पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने अतिउत्साही स्टंटबाज या पाण्यातून गाड्या घालून जीवघेणी कसरती करीत होते. त्यामुळे काहीजण पडले व सावरुन बाहेर आले.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.


No comments:

Post a Comment

Advertise