Type Here to Get Search Results !

घरातून चोरी ; ३१ हजार रुपयांचा ऐवज लंपास


माणदेश एक्सप्रेस न्युज
सोलापूर/प्रतिनिधी : घरातील उघड्या दरवाजातून कुणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मजहर नौशाद सय्यद (वय-३१) रा.६१, आनंदनगर,भाग-३,नई जिंदगी सोलापूर यांच्या उघड्या घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. व घरामध्ये असलेला विवो कंपनीचा १० हजार रुपयांचा मोबाईल, पाच ग्रॅम वजनाची १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी, रोख रक्कम ६ हजार ३०० रुपये असा एकूण ३१,३०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास ६१, आनंद नगर,भाग-३ नई जिंदगी, सोलापूर येथे घडली. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार पवार हे करीत आहेत.

दैनिक माणदेश Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies