Type Here to Get Search Results !

संविधान ग्रंथदिंडी संपन्न.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : फुले शाहू आंबेडकर विचारमच आटपाडी यांच्या वतीने संविधान जनजागृती सप्ताह निमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने आटपाडी शहरातून संविधान ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची वेशभूषा परिधान केलेली मुले या संविधान ग्रंथदिंडीचे खास आकर्षक होते.
या ग्रंथदिंडीचा उद्घाटन सोहळा आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी संविधानच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी विचारमंचचे अध्यक्ष राजेंद्र खरात, उपाध्यक्ष लक्ष्मण मोटे साहेब, सचिव सुरेश मोटे, जेष्ठ पत्रकार सादिक खाटीक, रणजीत ऐवळे, श्याम ऐवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी राजारामबापू हायस्कूल, भवानी हायस्कूल, वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूल, जि.प. शाळा नं.१ ची मुले व मुली हा ग्रथदिंडी मध्ये सहभागी झाली होती. संविधानाचा विजय असो, डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचा विजय असो च्या घोषणांनी मुलांनी आटपाडीची मेन व्यापारी पेठ दणाणून सोडली. राजारामबापू हायस्कूल ते मेन व्यापारी पेठ, बाजार पटांगण, सांगोला चौक ते राजारामबापू हायस्कूल असा दिंडीचा मार्ग होता. यावेळी विचारमंचच्या वतीने मुलांना गोड खाऊ वाटप करण्यात आला.
आमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस whatsapp group मध्ये join होण्यासाठी click करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies