Type Here to Get Search Results !

वेग मर्यादेचे उल्लघंन झाल्यास घरपोच मिळणार दंडाची नोटीस अत्याधुनिक साधनसामुग्रीयुक्त वाहन ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात दाखल





माणदेश एक्सप्रेस न्युज 
सोलापूर/प्रतिनिधी : प्राणांतिक अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा समितीने केलेल्या सूचनांनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी अत्याधुनिक साधनसामुग्रीयुक्त वाहन ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालय स्थापित केलेल्या रस्ता सुरक्षा समितीने सन २०२० पर्यंत प्राणांतिक अपघाताचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याच्या उद्देशाने अपघातास कारणीभूत असणाऱ्या महत्वाच्या कारणांपैकी भरधाव वेगाने वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, विना हेल्मेट चालक, शिटबेल्ट न वापरणे व इतर वाहनचालकांवर प्रभावीपणे कारवाई करणेकरीता सोलापूर ग्रामीण दलास अत्याधुनिक साधनसामुग्री असणारे (Interceptor Vehicle) वाहन अपर पोलीस महासंचालक (वाह) यांचेकडून पुरविण्यात आले असून या वाहनामध्ये गाडीची वेग मर्यादा, ब्रिथ अनॉलायझर, गाडीच्या काचेवरील फिल्मची जोडणारे मशिन (टेन्ट मिटर) इत्यादी सुविधा आहेत, असे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रारंभी सांगितले.
राज्याचे अपर पोलीस महासंचालक (वाह) यांनी, त्यांना असलेल्या अधिकाराचा महाराष्ट्रातील रस्त्याकरीता वाहनाच्या वर्गानुरूप महत्तम वेग मर्यादासंबंधी दि. २५  ऑक्टोबर २०१९ रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. हि अधिसूचना दि. १८ नोव्हेंबर २०१९ रोजीपासून पुढील आदेशापर्यत लागू राहणार आहे. या व्हॅनमधील मशीन १०० मीटर परिसरातील वाहनांची वेगमर्यादा ओलांडणाऱ्या गाडीचा क्रमांक कैप्चर करते. हा क्रमांक कंट्रोलकडे जातो. तेथून संबंधीत गाडी मालकास दंडाची नोटीस घरपोच जाणार आहे. अनेक लोक गाडीच्या काचेला फिल्मींग (डार्क ग्लास) करतात, त्याची जाडी मोजण्याचे मशिनही या व्हॅनमध्ये आहे. अशा प्रकारच्या गाडीवर त्याची तपासणी करून जागेवरच दंडाची नोटीस देण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकाविरुध्द दंडात्मक कारवाई करणे या अत्याधुनिक व्हॅनच्या माध्यमातून अधिक सोपे झाले आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन न करता सुरक्षित प्रवास कसा होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही अपर पोलीस अधीक्षक झेंडे यांनी शेवटी केले.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies