शालेय राज्यस्तर कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, November 21, 2019

शालेय राज्यस्तर कॅरम क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन.माणदेश  एक्सप्रेस न्युज 
सांगली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्या विद्यमाने शालेय राज्यस्तर कॅरम क्रीडा स्पर्धां (१४, १७, १९ वर्षाखालील मुले) सन 2019-20 चे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांच्याहस्ते जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आले.  
या प्रसंगी कोल्हापूर विभागाचे प्र. उपसंचालक चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव योगेश फणसळकर, शिवछत्रपती पुरस्कार्थी सुजाता कल्याणी, सांगली जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शेखर माने, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे राष्ट्रीय पंच सुर्यकांत पाटील, राज्य पंच विनोद मयेकर आदि उपस्थित होते.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाकरिता मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्ह्यातून २०० खेळाडू मुले / मुली व पंच, व्यवस्थापक सहभागी झाले.
या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा १४, १७, १९ वर्षाखालील मुले संघ धमपुरी, तामिळनाडू या ठिकाणी होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली येथे दि. १७ व १८ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे. या स्पर्धेसाठी सहभागी खेळाडू यांच्यासाठी निवास व भोजनाची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल सांगली येथे करण्यात आली आहे.
या प्रसंगी कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाचे महाविर कुंभोजे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेसाठी नियुक्त पंचांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पवार यांनी केले. आभार सीमा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, एल. जी. पवार, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, जमीर अत्तार, आरती हळींगळी, सीमा पाटील, राहुल पवार, मुन्ना आलासे, गजानन कदम, मंदाकिनी पवार आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Advertise