सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान वाढ व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी द्या : सतिश भिंगे. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, November 19, 2019

सार्वजनिक ग्रंथालयांचे अनुदान वाढ व कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी द्या : सतिश भिंगे.


माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : सार्वजनिक ग्रंथालयाची अनुदान वाढ करावी, कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करावी अशा  मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कृती समिती व कर्मचारी संघटनेच्या वतीने विधान परिषदेच्या  उपाध्यक्ष नीलम गोहे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
 विटा येथे ओला दुष्का्ळ संदर्भात  पहाणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, खा. विनायक राऊत, माजी मंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे, आ. अनिल बाबर, शिवसेनेचे पदाधिकारी यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांगली जिल्हा ग्रंथालय कर्मचारी संघटना व सांगली जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे संचालक सतीश भिंगे यांनी भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत ते सोडविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. गेली दहा वर्षे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ग्रंथालय चळवळीला मरगळ आली आहे. सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यांच्या जीवनात अंधकार निर्माण झाला आहे. कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. महागाईमुळे आर्थिकदृष्ट्या सार्वजनिक ग्रंथालय चालविणे संस्थाचालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे ग्रंथालयांचे अनुदान दुप्पट वाढ करावी कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.

No comments:

Post a Comment

Advertise