Type Here to Get Search Results !

स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी आणि मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रा.लि. यांच्यात सामंजस्य करार संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांची माहिती.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
पंढरपूर : गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) आणि औषध निर्माण क्षेत्राशी निगडीत असलेल्या शिरोळी (जि.कोल्हापूर) येथील मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात ‘प्रमोशन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन’ करीता सामंजस्य करार नुकताच स्थापित करण्यात आल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली. 
 स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी (बी.फार्मसी) मधील विद्यार्थी आणि स्टाफ यांना औषध निर्माण क्षेत्रासंबंधी प्रात्यक्षिक देणार आहेत. तसेच संशोधन प्रकल्पासाठी सहायता करणार असून विद्यार्थी व स्टाफ यांना या कराराच्या माध्यमातून विविध कंपन्यांना भेटी देवून योग्य मार्गदर्शन घेता येणार आहे. या सामंजस्य कराराचा विद्यार्थी व प्राध्यापकांना फायदा होणार आहे. ‘अॅनॅलॅटीकल मेथड डेव्हलपमेन्ट अॅण्ड फोर्मूलेशन मेथड डेव्हलपमेन्ट अॅण्ड व्हॅलीडेशन’ या संदर्भातील समर प्रोजेक्ट कंपनीने विद्यार्थ्यांना करण्याची परवानगी या कराराद्वारे दिली आहे. हा सामंजस्य करार २०१९ ते २०२२ या तीन वर्षापर्यंत असून या करारावर मिस्टेअर हेल्थ अँड हायजीन प्रा.लि. या कंपनीचे संचालक तेजस ठाकूर, सरव्यवस्थापक  प्राजक्ता पाटील व प्रकल्प व्यवस्थापक अजित पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या करारासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, प्रा. व्ही. व्ही. मोरे व प्रा. पी.के. खुळे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. यापूर्वी बी फार्मसीची आठ कंपनी समवेत सामंजस्य करार झाला असून आता यात या कराराची भर पडली आहे. या करारामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी थेट औषध निर्मिती कंपन्यांबरोबर संपर्क साधून नवीन संशोधन व औषध निर्मिती करण्यासाठी अधिक माहिती मिळवू शकतात. हा करार स्थापन केल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies