आटपाडीचा उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा उत्साहात संपन्न. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, November 22, 2019

आटपाडीचा उत्तरेश्वर देवस्थानची यात्रा उत्साहात संपन्न.

माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवस्थानची कार्तिक यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यात्रेसाठी सागवानी नवीन रथ कर्नाटक राज्यातून बनवून आणला होता. मा.आ. राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या संकल्पनेतून व सहकार्यातून तो देवस्थानला अर्पण करण्यात आला. पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख त्यांच्या सुविद पत्नी ऐश्वर्या यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर तो देवस्थान समितीला अर्पण करण्यात आला.
मा.आ. राजेंद्रअण्णा देशमुख, सरपंच वृषाली पाटील, अँड धनंजय पाटील यांच्या हस्ते रथोत्सव मिरवणुकीचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, माजी उपसभापती काकासाहेब पाटील, कलेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप पाटील, संचालक अजयकुमार भिंगे, उपसरपंच प्रा. अंकुश कोळेकर, दिलीपशेठ माळी, बाबासाहेब माळी, रावसाहेब सागर, जयंत नेवासकर, राहुल गुरव, सुरेश बालटे, बजरंग फडतरे, शशिकांत सागर, ग्रामपंचायतीच्या सदस्या सुवर्णा माळी, रेखा ऐवळे, स्वाती देशमुख, लक्ष्मी बालटे, नितीन सागर, बाळासाहेब मेटकरी, उमाकांत देशमुख, दत्तात्रय अडसूळ, विजयकुमार पाटील, प्रदिप लांडगे, सर्जेराव राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नंदकुमार पाठक, बाबुराव गुरव यांनी पौरहत्य केले. पौर्णिमेपासून आटपाडी यात्रा सुरू झाली. काल यात्रेचा मुख्य दिवस होता. मंदिरात रथाच्या दर्शनासाठी भाविक व महिलांनी गर्दी केली होती. माणदेशातील खिलार जातीवंत जनावरांचे प्रदर्शन उत्तरेश्वर मंदिराच्या पटांगणात झाले त्यास हौशी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सायंकाळी 5 वाजता बाजार पटांगणातील उत्तरेश्वर मंदिरापासून रथोत्सवाची मिरवणूक सवाद्य निघाली. या मिरवणुकीच्या अग्रभागी अश्व, महाराष्ट्र ब्रास बँड, हलगी पथक होते.

No comments:

Post a Comment

Advertise