मका पीक पाहणी व शेतकरी चर्चासत्र. - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, November 27, 2019

मका पीक पाहणी व शेतकरी चर्चासत्र.माणदेश एक्सप्रेस न्युज 
आटपाडी/वार्ताहर : कावेरी सिड्स कंपनी लि. व मंगलमूर्ती फळबाग व भाजीपाला संघ आटपाडी यांच्या सहयोगाने उत्कृष्ट मका प्लॉट पाहणी व शेतकरी चर्चासत्र महादेवशेठ बनसोडे यांच्या मका प्लॉट मध्ये आयोजन केले असल्याची माहिती आटपाडी बाजार समितीचे संचालक व मंगलमूर्ती उद्योग समुहाचे पंढरीनाथ नागणे यांनी दिली. 
आटपाडी परीसराश तालुक्यामध्ये मका पिकावर लष्करी आळी व इतर कीड रोगांनी थैमान घातले आहे. याला न जुमानता बनसोडे यांनी कावेरी सिड्स कंपनीचे  3712 या वाणाचे बियाणे वापरून उत्कृष्ट नियोजन करून मोठे उत्पन्न घेतले आहे. यासाठी त्यांनी योग्य व नियोजन पूर्वक कीटकनाशक फवारणी करून कीड रोगापासून मक्याचे संरक्षण केले.या कार्यक्रमासाठी कावेरी सिड्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी तसेच कृषि खात्यातील अधिकारी यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या चर्चासत्र बुधवार दि. २७ रोजी स. १०.३० ला महादेव बनसोडे मापटेमळा येथे कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात  उपस्थित राहण्याचे आवाहन मंगलमूर्ती फळबाग संघाचे चेअरमन पंढरीनाथ (नाना) नागणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Advertise